breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी धडकी भरवणारी

नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. अशात चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,00,739 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,038 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,40,74,564 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 73 हजारांवर पोहोचला आहे.

महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. तसेच आता हरिद्वारमध्ये फक्त दोन दिवसांत एक हजाराहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मंगळवारी 594 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर सोमवारी हरिद्वारमध्ये 408 रुग्ण आढळले होते.

कुंभमेळ्यातील शाहीस्नान सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती. यानंतर शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 2812 वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button