breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

धोनीच्या संघाचे भवितव्य आज ठरण्याची शक्‍यता

अबूधाबी – महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून स्पर्धेतील संभाव्य विजेत्यात गणला जातो, पण यंदाच्या स्पर्धेत आव्हान संपुष्टात आलेला पहिला संघ ठरण्याची शक्‍यता आहे. प्ले ऑफच्या आशा कायम राखण्यासाठीच उद्या चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे.

गुणतक्‍क्‍यात चेन्नई सातव्या, तर राजस्थान आठव्या आहेत. दोघांचे नऊ सामन्यांनंतर सहा गुण आहेत. प्रत्येकी पाच सामने शिल्लक असताना आता पराजित झाल्यास प्ले ऑफच्या धूसर आशाही संपुष्टात येतील याची त्यांना जाणीव आहे. याचवेळी चेन्नईचे प्रश्‍न वाढत आहेत. द्वेनी ब्राव्होला दुखापत झाली आहे, तसेच त्यांच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जाही खालावत आहे. धवनला 25 आणि 79 धावांवर दिलेल्या जीवदानाचा फटका चेन्नईला दिल्लीविरुद्ध बसला आहे.

अखेरच्या षटकातील अपयशावर राजस्थानला अद्याप उत्तर सापडलेले नाही. स्टीव स्मिथला पुन्हा गवसलेला सूर ही त्यांच्यासाठी जमेची बाब आहे. बेन स्टोक्‍सने अद्याप निराशाच केली आहे, तर जोस बटलरच्या कामगिरीत सातत्य नाही. विस्कळित गोलंदाजी पाहता त्यांचे आव्हानही खडतर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button