breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

काँग्रेसने संविधानाचा वारंवार अपमान केला : मोदी

नवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलत आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा देत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

सरकारने महागाईवर नियंत्रण मिळवले. जीएसटीमुळे १ लाख कोटी देशाचे उत्पन्न वाढले
एफडीआयने ६०० कोटी डॉलर्सचा टप्पा गाठला. भ्रष्टाचारासारख्या घटनांवर मात करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

मोदी म्हणाले, “सरकार बदलले आहे. दृष्टीकोन सुद्धा बदलण्याची आवश्यकता आहे. एका नव्या विचाराची आवश्यकता आहे. आम्ही जर जुन्हा पद्धतीनुसार चाललो असतो तर 70 वर्षांनंतरही या देशातून कलम 370 रद्द झाले नसते. मुस्लिम महिलांना तीन तलाक मधून मुक्ती मिळाली नसती. रामजन्मभूमी अद्यापही विवादित राहिली असती. करतारपूर साहिब कॉरिडोर देखील उभारले गेले नसते. तसेच बांगलादेशसोबतचा सीमा वाद सुटला नसता.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button