TOP Newsपिंपरी / चिंचवड

वायसीएम मधील डॉक्टरचा पालिकेच्या गेटवर आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी l  प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (शुक्रवारी, दि. 17) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. आत्महत्या करणारी व्यक्ती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात डॉक्टर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास एक व्यक्ती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आली. त्या व्यक्तीने सोबत आणलेले डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडून लायटर जप्त केले आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात डॉक्टर असल्याचे समजत आहे. मागील काही महिन्यांचा पगार झाला नाही. काही अडचणी असल्याचे ती व्यक्ती वारंवार सांगत आहे. मात्र हे पाऊल उचलण्यामागे नेमके काय कारण आहे, हे त्या व्यक्तीकडून अदयाप पोलिसांना समजलेले नाही. दरम्यान संबंधित व्यक्ती एका खाजगी कंपनीद्वारे कंत्राटी पद्धतीने काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button