breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

फेब्रुवारीमध्ये राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा

पिंपरी । प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान व  श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान  आयोजित 22 वी  ‘कै. राम गणेश गडकरी करंडक, राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा-2021’ चे आयोजन चिंचवड येथे 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ही स्पर्धा होणार आहे. नाट्यगृहे खुली झाली ही बाब सगळ्याच कलाकारांना उत्साह देणारी बाब आहे.  कलाकारांना  पुन्हा  ऊर्जा देण्यासाठी  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेने, यंदाच्या आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षात  ही 22 वी स्पर्धा घेण्याचे निश्चित केले आहे. अर्थात सर्व कलाकारांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी कोरोना बाबत असलेली सर्व शासकीय बंधने पाळून, ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button