breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात आतापर्यंत 3.21 लाख प्रकरणे: 24 तासांत सर्वाधिक 12 हजार 31 रुग्णांची वाढ

नवी दिल्ली | देशात कोरोना संक्रमितांची संख्या 3 लाख 21 हजार 642 झाली आहे. शनिवारी एका दिवसात सर्वाधिक 12 हजार 31 नव्या रुग्णांची वाढ झाली. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. दुसरीकडे दिल्लीत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने 20 हजार बेड जोडण्याची योजना तयार केली आहे. यासाठी नर्सिंग होम, हॉटेल आणि बँक्वेट हॉलचा वापर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान हॉटेल आणि बँक्वेट हॉलमध्ये सुमारे 15 हजार बेड तयार करण्यात येणार आहे. 

यापूर्वी शनिवारी केजरीवाल सरकारने 10 ते 49 बेडची क्षमता असलेले सर्व मल्टीस्पेशलिटी नर्सिंग होमला कोविड-19 नर्सिंग रुग्णालय घोषित केले. सरकारनुसार, असे सर्व नर्सिंग होमने 3 दिवसांत कोविड रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी स्वतःला तयार करावे लागेल. असे न केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रविवारी सकाळी ट्वीट केले की, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे 5 हजारपेक्षा अधिक बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध होतील. काही दिवसांत आमचे अधिकारी नर्सिंगहोमचे मालकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी दूर करतील. दिल्लीतील कोरोच्या परिस्थितीवर गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, एलजी अनिल बॅजल यांच्यासोबत बैठक सुरू झाली. यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन देखील सहभागी आहेत. दिल्लीत शनिवारी 2134 रुग्ण वाढले. सध्या दिल्लीतील संक्रमितांची संख्या 38 हजार 958 झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button