Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका; तुरुंगात असणाऱ्या पत्रकार सिद्दीकी कप्पन यांच्या नऊ वर्षांच्या लेकीचे मन हेलावणारे भाषण

नवी दिल्लीः ऑक्टोबर २०२०पासून तुरुंगात कैद असणाऱ्या पत्रकार सिद्दीकी कप्पन यांच्या नऊ वर्षांच्या लेकीच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त मेहनाज कप्पन हिने एक भाषण केले होते. हे भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नोटापरम जीएलपी सरकारी शाळेत ती शिकत असून तिथेच तिने हे भाषण केले आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर सिद्दीक कप्पन घटनास्थळीजात असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर UAPAअंतर्गंत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हाच धागा पकडत मेहनाजनं भाषण केलं आहे. तिनं भाषणाच्या सुरुवातीलाच तिची आणि वडिलांची ओळख करुन दिली आहे.

मेहनाज भाषणात काय म्हणाली?

मी मेहनाज कप्पन, पत्रकार सिद्दीकी कप्पन यांची मुलगी, भारताचा एक असा नागरिक ज्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं असून त्याला अंधाऱ्या कोठडीत राहण्यास भाग पाडले जात आहे. आजच्या या दिवशी आपण देशाचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. मला याचा अभिमान आहे आणि त्या अधिकाराने मी ‘भारत माता की जय’ म्हणतेय. आज आपण ज्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत आहोत तो गांधीजी, नेहरू, भगतसिंह आणि असंख्य महान क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच, असं मेहनाज तिच्या भाषणात उल्लेख करत आहे.

“१५ ऑगस्टला स्वतंत्र झालेल्या भारताच्या स्वाभिमानाशी तडजोड होता कामा नये. मात्र आज सर्वत्र अशांतता आहे. धर्म, जात, राजकारण यावरून सर्वत्र हिंसाचार होत आहे. हे सर्व आपण प्रेमाने आणि ऐक्याने पुसून टाकले पाहिजे. अशांततेची सावली पुसली पाहिजे आणि सर्वांनी मिळून हे जीवन जगले पाहिजे. आपल्याला भारताला यशाच्या शिखरावर नेले पाहिजे. आपण न लढता एका चांगल्या उद्याची स्वप्ने पाहिली पाहिजे. भारतातील सामान्य नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये .भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व शूर देशभक्तांचे स्मरण करून मी आपले भाषण थांबवते, असं लहानग्या मेहनाजने म्हटलं आहे.

दरम्यान, केरळ युनिअन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट (KUW) आणि सिद्दीकी यांच्या पत्नी या कप्पन यांच्या सुटकेसाठी लढत आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी कप्पन यांच्यावर जाणीवपूर्व ही तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी कप्पन यांच्यावर शांति भंग करणे UAPAअंतर्गंत तक्रार दाखल केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button