breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘खेलो इंडिया युथ गेम्स-2019 ‘ स्पर्धेसाठी पिंपरी महापालिकेची खर्चाला मान्यता

पिंपरी ( महा ई न्यूज ) – केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने 9 ते 20 जानेवारी 2019 या कालावधीत खेलो इंडिया युथ गेम्स-2019 ‘ स्पर्धा होणार आहेत. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर होणा-या या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने 35 लाख 73 हजार रुपये खर्च करणार असून या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली.

आगामी ऑलंपिक आणि आशियाई स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने गुणवंत व उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि येत्या काळात हिंदूस्थान खेळामध्ये महाशक्ती होवा. यासाठी केंद्र शासनातर्फे खेलो इंडिया युथ गेम्स आयोजित करण्यात येतात. त्याअनुषंगाने केंद्र आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 17 वर्षाखालील ‘खेलो इंडिया युथ गेम्स-2019’चे आयोजन करण्यात येणार आहे. 9 ते 20 जानेवारी 2019  या कालावधीत होणारी ही द्वितीय स्पर्धा बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकूल येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, टेनिस, जिमनॅस्टीक, ज्यूदो, शुटींग, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, कुस्ती, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉल आदी विविध अठरा खेळ होणार आहेत. या स्पर्धेत सुमारे एक हजार खेळाडू, तांत्रिक अधिकारी आणि स्वयंसेवक सहभागी होणार असून स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय आणि राज्याचे क्रीडामंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. या क्रीडा स्पर्धेतील काही कामांची जिम्मेदारी पुणे विभागी आयुक्त कार्यालयातर्फे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सोपविण्यात आली आहे.

त्यामध्ये बालेवाडी क्रीडा संकुलातील फायर हायड्रंट सिस्टीम दुरूस्त करणे, स्पर्धा कालावधीत एक वाहन आणि तज्ज्ञ पथकासह अग्निशामक प्रतिबंध व्यवस्था सुसज्ज करणे, क्रीडा संकुलात होणा-या कच-याचे यवस्थापन करणे, त्यासाठी आवश्यक 5 मोठे आणि 50  लहान डस्टबीन, तसेच हा कचरा उचलण्यासाठी 1 मोठे व 10 लहान वाहने आणि 50 स्वच्छता कर्मचारी पुरविणे, चार मुव्हेबल टॉयलेट उपलब्ध करणे, क्रीडा संकुलातील पथदिव्यांची दुरूस्ती करणे आणि नुतनीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. त्यासाठी महापालिकेला 35 लाख 73 हजार रुपये इतका खर्च येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button