breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सांगली जिल्हा परिषदेतील भाजप सदस्यांमध्ये असंतोष; एकाची पक्षाला सोडचिठ्ठी

सांगली |

पदाधिकारी बदलाचे वचन न पाळल्याने नाराज झालेल्या जिल्हा परिषदेतील भाजप सदस्यांमध्ये असंतोष पसरला असून पलूस तालुक्यातील एका सदस्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. तर आणखी सात जण पक्षत्याग करण्याच्या मानसिकतेत आहेत. घटक पक्षाच्या पाठिंब्यावर असलेली भाजपची जिल्हा परिषदेतील सत्ता यामुळे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता गेल्यानंतर सावध झालेल्या भाजप नेत्यांनी जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल टाळला. त्यामुळे पदाधिकारी पदासाठी इच्छुक असलेल्या भाजपमधील सदस्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. अखेर अंकलखोपचे जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील, जेष्ठ नेते एकनाथ खडसे, आ. अरुण लाड, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड यांच्या उपस्थितीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. पदवीधर मतदार संघाचे आ. अरुण लाड आणि जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड यांनी नवले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी पुढाकार घेतला. श्री. नवले भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या जवळचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. जत, मिरज आणि तासगावमधील भाजपचे आठ सदस्य नाराज असून तेही पक्षत्याग करण्याच्या तयारीत असल्याने जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता अल्पमतात येण्याची चिन्हे आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button