breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

लोक अदालतीमध्ये तब्बल एक हजार 357 तक्रारींचा निपटारा

  • एक कोटी 79 लाखांचा महसूल जमा

पुणे – तालुका विधी सेवा समिती आणि वडगाव मावळ बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव मावळ न्यायालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी (दि. 25) झालेल्या या लोक अदालतीमध्ये तब्बल एक हजार 357 तक्रारींचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला. यामुळे शासनाला एक कोटी 79 लाख 25 हजार 255 रुपये एवढा महसूल मिळाला.

वडगाव मावळ न्यायालयात दि.25 सप्टेंबर रोजी तालुका विधी सेवा समिती व वडगाव मावळ बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले होते या लोकन्यायालया मध्ये सामंजस्याने फौजदारी, दिवाणी, तसेच दाखलपुर्व अशा एकुण 1357 केसेस निकाली निघाल्या तसेच यामधुन एकुण रक्कम 1,79,25,255/- रुपयांचा महसुल जमा झाला.

आपआपसातील भांडणे मिटवण्यासाठी लोकन्यायालय म्हणजे एक सुवर्ण संधी आहे त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा असे मत पुणे येथील वरीष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश पी. जी. देशमुख यांनी व्यक्त केले.

माणसाने आपला अहंकार बाजुला ठेवुन लोकन्यायालयात आपले वाद सामंजस्याने मिटवावेत असे आवाहन वडगाव मावळ न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सी. आर. उमरेडकर यांनी केले. नागरीकांचे वाद लोकन्यायालयात मिटावेत यासाठी सर्व वकील लोकन्यायालयात सहभाग घेतात असे मत वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. तुकाराम काटे यांनी व्यक्त केले.

आयोजित लोकन्यायालयात पुणे येथील वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश पी. जी. देशमुख,वडगाव मावळ येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सी. आर. उमरेडकर, सह न्यायाधीश बी. व्हि. बुरांडे, एस.जे. कातकर, एम.ए.के.शेख, पी.एम. सुर्यवंशी, जी. एस. पाटील यांच्या बरोबर ॲड. प्रताप मेरुकर, ॲड. सोनाली काळे, ॲड. प्रमोदिनी पंडीत, ॲड. विनय दाभाडे, ॲड. राधा कलापुरे, ॲड. समिर खांदवे, ॲड. अश्विनी पैकेकर, ॲड. विकास नवघने, ॲड. मृणाल पवार, ॲड. हेमंत वाडेकर, ॲड. रामदास नानेकर, ॲड. संतोष गराडे,ॲड. निलेश हांडे, ॲड. प्रिया काकडे, ॲड. स्मिता देशमुख, ॲड. रुबीया तांबोळी, ॲड. चेतन कदम, ॲड. सुरज मेस्ञी यांनी पॕनल जजेस म्हणून काम पाहिले.

लोकन्यायालयाच्या नियोजनामध्ये वडगाव मावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. तुकाराम पंढरीनाथ काटे, सचिव ॲड. महेंद्र खांदवे, ॲड. जयश्री शितोळे, खजिनदार ॲड. दिपक वाकडे, विधीसेवा समितीचे अधिकारी सुनिल केवटे यांनी भाग घेतला. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी वडगाव मावळ बार असोसिएशनचे सभासद वकिल बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button