breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा भडकले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली असतानाच आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

देशात महागाईने सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला असतानाच इंधन दरवाढीने आणखी चिंतेत भर पडली आहे. मुंबईमध्ये सध्या 102.82 रुपये प्रति लिटर पेट्रोलचा दर असून डिझेल 94.80 रुपये प्रति लिटर एवढा आहे. मे महिन्यापासुन पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरांमध्ये 24 वेळा वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात परभणीत सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेलची विक्री सुरू आहे. परभणीतील पेट्रोलचा दर 105 रुपये 80 पैसे प्रति लिटर डिझेल 95 रुपये 66 पैसे प्रति लिटरवर पोहोचले आहे. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकल्याने नागरिकांच्या चिंतेत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण होत असताना भारतात इंधन दरवाढ सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या भारतातील इंधन दरवाढ आटोक्यात आणून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button