breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

‘पेपरलेस काम करा, तंत्रज्ञानाचा वापर करा’, कर्मचाऱ्यांना सूचना, मुख्यमंत्र्यांचं दीड वर्षानंतर मंत्रालयात पाऊल!

मुंबई |

गतिमान कारभार करताना अधिकाधिक पेपरलेस काम आणि तंत्रज्ञानाचा उपयोग कसा वाढेल ते पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जवळपास दीड वर्षानंतर मंत्रालयात पाऊल ठेवलं. त्यांनी मंत्रालयातल्या काही विभागांना आज भेटी दिल्या तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ई टपाल, पेपरलेस कामकाज प्रणाली विषयी सूचना केल्या व अडचणी विचारल्या. यावेळी कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करताना एका दिव्यांग कर्मचाऱ्याची त्यांच्यासमवेत छायाचित्र घेण्याची इच्छाही पूर्ण केली आणि त्याची विचारपूसही केली.

  • कर्मचाऱ्यांशी थेट चर्चा

त्रिमुर्ती प्रांगणातील प्रदर्शनाची तयारी पाहून मुख्यमंत्री प्रथम मंत्रालयातील विस्तारित इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांना भेटले. त्याठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सजावटीचे त्यांनी कौतुक केले तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेचेही पूजन केले. कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्या कमाविषयीही त्यांनी माहिती घेतली.

यानंतर मुख्यमंत्री महसूल विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, विधी व न्याय अशा विभागात प्रत्यक्ष आतमधून फिरले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी मुख्य सचिवांनी मंत्रालयात ६ एप्रिलपासून फाईल्स आणि कागदपत्रे यांचे संगणकीकरण तसेच स्वच्छता, अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट याची मोहीम सुरु असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी देखील पेपरलेस कामांवर भर देताना तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त उपयोग करावा अशा सूचनाही केल्या. मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्ष तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील कक्षांना देखील भेट देऊन पाहणी केली व कामकाजाविषयी महत्वपूर्ण सूचना केल्या.

  • कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी
    मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही आपल्या भेटीस आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या आपलेपणामुळे व प्रत्यक्ष कामकाजाविषयी केलेल्या सुचनांमुळे उत्साह दुणावल्याची प्रतिक्रिया गृह विभागातील कर्मचारी अश्विनी राम धावणे यांनी दिली. याच विभागातील प्रगती विकास मोरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button