breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी ठेकेदाराला दिले थेट पध्दतीने काम

  • आयुक्त राजेश पाटील यांच्या प्रस्तावावर स्थायी समिती मेहरबान
  • चार कोटी 20 लाख रुपयांच्या खर्चाला दिली कार्योत्तर मान्यता

पिंपरी / महाईन्यूज

कोरोनाकाळात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने भोसरी, जिजामाता आणि आकुर्डी रुग्णालयाकरिता ऑक्सिजन निर्मितीसाठी 930 एलपीएम क्षमतेचे तीन ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या 4 कोटी 20 लाख रुपयांच्या खर्चाला आज स्थायी समिती सभेत कार्योत्तर मान्यता देण्यात आली. आपात्कालीन परिस्थितीचा फायदा घेत नवनियुक्त आयुक्तांनी मे. प्राईम सर्जिकल अँण्ड फार्मा संस्थेची थेट पध्दतीने नेमणूक केली असून त्यांच्यासोबत करारनामा करुन घेतला आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेचा प्रादुर्भाव झाल्यामुळे दिवसाला शंभरच्या जवळपास लोकांचे प्राण जात आहेत. तीन हजारहून अधिक नागरिक पॉझीटिव्ह येत आहेत. रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत. उपचार घेणा-या रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. ऑक्सिजन नसल्यामुळे राज्यातील अनेकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आयुक्त राजेश पाटील यांनी दक्षता बाळगून पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी भोसरी, जिजामाता आणि आकुर्डी रुग्णालयात 930 एलपीएम क्षमतेचे ऑक्सिजन मेडिकल गॅस जनरेटर प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेतला. चिंचवड येथील मे. प्राईम सर्जिकल अँण्ड फार्मा संस्थेला थेट पध्दतीने काम देण्यात आले.

तीन रुग्णालयामध्ये राबविण्यात येणा-या या प्रकल्पासाठी 4 कोटी 20 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. एवढा खर्च करण्यास त्यांच्यासोबत करारनामा करून घेतला आहे. आजच्या स्थायी समितीच्या सभेत याला कार्योत्तर मान्यता घेतली आहे. एका रुग्णालयात एक युनिट उभारण्यासाठी 1 कोटी 40 लाख याहून अधिक खर्च येणार आहे. 20 दिवसात हे काम करून घेण्यात येणार आहे. तीन प्रकल्पासाठी येणा-या 4 कोटी 20 लाख खर्चास तसेच त्यापोटी  50 टक्के अगाऊ बिनाव्याजी देण्यास स्थायी समितीने आज मान्यता दिली आहे. वास्तविक पाहता अशा कामांसाठी रितसर निविदा राबविणे अपेक्षित असते. मात्र, आयुक्त राजेश पाटील यांनी स्वाधिकाराचा वापर करून हे काम थेट पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button