breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

दिपावलीनिमित्त कंत्राटी कामगारांनाही बोनस देण्याची मागणी

  • भाजपा कामगार आघाडीचे हनुमंत लांडगे, दिपक गळीतकर यांचे निवेदन

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील कंत्राटी कर्मचा-यांच्या मासिक पगार व दिपावली निमित्त बोनस देण्यात यावा व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत लांडगे व सदस्य दिपक गळितकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने विविध विभागात ठेकेदारी करार पद्धतीने जवळपास १० हजार पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांची नेमणुक केलेली आहे. या कामगारांना महानगरपालिकेने करारानुसार दरमहाच्या पगारातुन किमान वेतन कायद्यानुसार दरमहा ८.३३ टक्के बोनसची रक्कम अदा केला जातो. परंतु प्रत्येक ठेकेदार त्या कर्मचा-यांना दरमहा तो मिळणारा बोनस दरमहा देत नाही. सदरचा बोनस रक्कम ही दिवाळीसाठी राखुन ठेवला जातो. परंतु प्रत्येक ठेकेदार तो बोनस कामगारांना देईलच असे होत नाही.

आपण प्रत्येक विभागाला कळवुन कंत्राटदारांना त्यांच्या कर्मचा-यांना दिवाळीपुर्वी बोनसची रक्कम अदा करण्याचे आदेश द्यावे. तसेच कंत्राटी कामगारांच्या सेवाशर्तींबाबत झालेल्या कराराचे पालन व्हावे आणि कंत्राटी कामगारांना बोनस अदा केलेबाबतचा सविस्तर पुर्तता अहवाल उलट टपाली मिळावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button