breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Bhosari : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उमेदवाराच्या घोषणेची प्रतिक्षा, अजितदादांना घालणार साकडे

  • खासदार कोल्हेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास बळावला
  • भोसरीतून राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयासाठी कसली कंबर

पिंपरी, (महाईन्यूज) – शिरूरचा गड जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांनी आता भोसरी विधानसभा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. आतापासूनच कामाला लागण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उत्साह मावेनासा झाला आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयानंतर भोसरी विधानसभेत राष्ट्रवादीचाच आमदार होणार असा आत्मविश्वास वाढत चालला आहे. अजित दादांनी केवळ उमेदवाराचे नाव घोषीत करावे, त्यानंतर आम्ही हिरीरीने कामाला लागू, अशी भावना भोसरीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत करून राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या ताब्यातील शिरूरचा गड राष्ट्रवादीकडे खेचून आणला. ज्या भागातील मताधिक्यांमुळे हे शक्य झाले. त्यापैकी भोसरी विधानसभा मतदार संघ हा एक भाग आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि माजी आमदार विलास लांडे यांनी याच भागातून कोल्हे यांना मताधिक्य मिळवून दिले. कोल्हे यांच्या विजयात दत्ता काकांचा मौल्यवान वाटा आहे. मुळात शिरूरचा विजय हा कोल्हेंचा नसून दत्ता काकांचाच आहे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढू लागली आहे. त्यामुळे आगामी भोसरी विधानसभा मतदार संघातून काकांनी निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. म्हणून काकांनी सुध्दा राष्ट्रवादीच्या तिकीटासाठी दावा ठोकला आहे.

भोसरीतील माजी आमदार विलास लांडे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु, मागच्या वेळी आमदार महेश लांडगे यांनी त्यांचा पराभव केल्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याची शाश्वती कमी वाटते. त्यांना तिकीट दिले तर काका स्वबळावर निवडणुकीला सामोरे जातील. परिणामी, राष्ट्रवादीला नाराजीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे अजित दादांच्यापुढे आता दोन पर्यार आहेत. विलास लांडे किंवा दत्ता साने या दोघांपैकी एकाला तिकीट द्यावे लागणार आहे. काकांना तिकीट दिले तर आम्ही जोमाने कामाला लागू अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दोघांपैकी कोणाचे नाव तिकीटासाठी पुढे येते, हे पहावे लागणार आहे.

नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दादांची भेट घेणार
भाजपचे आमदार महेश लांडगे यांना टक्कर द्यायची म्हटल्यावर आतापासूनच कामाला लागण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्सुक झाले आहेत. केवळ दादांच्या एका निर्णयाची त्यांना अपेक्षा लागली आहे. दादांनी भोसरीच्या उमेदवाराचे नाव जाहीर केल्यानंतर त्यांचा विजय निश्चित मानला जावा, असे आव्हान स्थानिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. उमेदवारांचे नाव लवकर निश्चित करण्याची मागणी करण्यासाठी भोसरीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आजच अजित दादांची भेट घेणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून भोसरीतील उमेदवाराचा चेहरा कोण असणार याबाबत विचारणा करणार आहेत, अशी माहती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button