ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिनेश यादव यांचा ‘आरोग्य मित्र’ पुरस्काराने गौरव !

सामाजिक कार्याची दखल

पिंपरी : प्रतिनिधी
स्वीकृत नगरसेवक तथा पिंपरी-चिंचवड भाजयुमो सरचिटणीस दिनेश लालचंद यादव ययांना ‘आरोग्य मित्र विशेष गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यादव यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून काम केले. सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांना मदतीचा हात दिला. सामान्य नागरिकांसोबतच कष्टकरी कामगार यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले. निस्वार्थी सेवा करत असतानाच भारत सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रधानममंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेची शिबिरे आयोजित केली. या भरीव योगदाणाबद्दल त्यांना आरोग्य मित्र विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पंखाना बळ मिळाले !
आमदार महेश लांडगे आणि सर्वच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न असतो. कोरोना काळात समाजाच्या उपयोगी पडण्याची संधी मिळाली. या काळात आरोग्य सेवा ही सर्वात महत्वाची बाब असल्याचे त्याबाबत जास्त काम केले. सरकारच्या योजना योग्य सोप्या पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहचवणे महत्वाचे असते. कामाबाबत अनेकांनी पाठ थोपटली मात्र हा पुरस्कार पंखाना बळ देणारा असून लोकसेवेचे व्रत असेच सुरू राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button