breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीमध्ये ढोल-ताशा स्पर्धेचा दणदणाट!

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

नवचैतन्य तरुण मंडळ ‘आमदार चषक’चे मानकरी

पिंपरी : आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘आमदार चषक ढोल-ताशा’ स्पर्धेत दापोडी येथील नवचैतन्य तरुण मंडळाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या निमित्ताने ढोल-ताशांचा दणदणाट पहायला मिळाला.

महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे भोसरीत आमदार चषक ढोल झांज स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. बाळासाहेब पवळे, कालिदास लांडगे, संतोष लांडगे आणि अशोक शेडगे यांनी आयोजनासाठी पुढाकार घेतला. स्पर्धेत एकूण १७ पथक सहभागी झाले.

या स्पर्धेत नवचैत्यन्य तरुण मंडळ, दापोडी पथकाने आमदार चषकाचे मानकरी व प्रथम क्रमांक पटकावला. भैरवनाथ तरुण मंडळ, बोरज मावळ यांनी द्वितीय क्रमांक, रासाई तरुण मंडळ, वडगाव, शिरुर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, श्री भैरवनाथ तरुण मंडळ, काले मावळ चौथा, दत्त मंदिर, तरुण मंडळ, खडकी यांनी पाचवा, जय भवानी तरुण मंडळ, दिघी यांनी सहावा, सह्याद्री क्रीडा मंडळ, दिघी यांनी सातवा, कानिफनाथ तरुण मंडळ आढले, मावळ यांनी आठवा क्रमांक, भैरवनाथ तरुण मंडळ शिवणे, मावळ यांनी नववा आणि दहावा क्रमांक श्रीराम तरुण मंडळ, धनगव्हन मावळ यांनी पटकावला आहे.

 

हेही वाचा – दिवाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचा बालदिवस उत्साहात 

बालकलाकर अर्णव पराडेला पुरस्कार..

वैयक्तिक पारितोषिकमध्ये शिस्तबद्ध संघ दत्त मंदिर तरुण मंडळ, उत्कृष्ठ ढोलवादक विशाल दहिभाते, उत्कृष्ठ ताशावादक मनोज धारवाड, उत्कृष्ट घंटावादक राम जाधव, उत्कृष्ट झांज वादक जानव्ही वाळके यांना प्रदान करण्यात आले. बालकलाकार अर्णव परांडे यांना उत्कृष्ट ताशावादक पुरस्कार दिला. सूत्रसंचालन सतीश काकडे, गणेश लांडगे यांनी केले. पंच म्हणून अक्षय लांडगे, आशिष लांडगे, रोहिदास फुगे, रविंद्र यादगिरी यांनी काम पाहिले.

‘जॉब फेअर’मध्ये ८८९ युवकांना मिळाला रोजगार!

तसेच, भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दिघी येथे ‘जॉब फेअर’ चे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकाच दिवसात तब्बल ८८९ युवकांना नोकरीची संधी मिळाली. भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस आणि शहर चिटणीस कुलदीप परांडे यांच्या पुढाकाराने हा नोकरी मेळावा घेण्यात आला. त्याला परिसरातील युवकांनी उर्त्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चिखली येथे खेळ रंगला पैठणीचा..

चिखली येथील रिव्हर रेसिडेन्सी येथे माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने आकाश फल्ले प्रस्तूत ‘खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रथम क्रमांक फ्रिज, द्वितीय गॅस शेगडी, मिस्कर टेबल फॅन यासह मानाची पैठणी आणि भेटवस्तू अशी बक्षीसे देण्यात आली. यावेळी उद्योजक निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, सामाजिक कार्यकर्त्या मंगल जाधव, सोनम जांभूळकर, ॲड. महेश लोहारे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button