breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धरा दाम पण करा काम… भाजपाविरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे तुफान आंदोलन

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात ‘‘धरा दाम पण करा काम…’’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, मयूर कलाटे, वैशाली काळभोर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे,  युवा नेते संदीप पवार, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, आजी-माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी) महापालिकेवर मोर्चा काढला आहे. ”गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है”, ”भाजप वाल्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, ”आमच्या नळाला पाणी नाही”, ”आमच्या परिसरातील संडास सफा सफाई होत नाही, पैसे घ्या पण धुऊन द्या”, अशा जोरदार घोषणा देत महापालिकेवर मोर्चा काढला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून  महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. हातगाड्यावर टोपली ठेवली होती. त्यात नकली पैसे ठेवले होते.  ‘धरा दाम पण करा काम’ करा अशा घोषणा दिल्या जात होत्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button