breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

एकदा समोरासमोर बसुयात, होऊन जाऊ द्यात, धनंजय मुंडे यांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज

बीड |

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद येथील सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर एकापाठोपाठ एक पलटवार सुरु केले आहेत. या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उडी घेतली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) हे शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याचा आरोप करतात. एकदा आपण समोरासमोर बसुयात. मग कोण किती जातीयवादी आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. ते सोमवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मशिदींवरी भोंग्यांपेक्षा बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. भोंगे लावून किंवा काढून आजच्या तरुणांना भाकर मिळणार आहे का? मनसे दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. भोंग्यांचा प्रश्न सुटल्यास महाराष्ट्र आणखी प्रगत होणार असेल तर मी त्यांची भूमिका योग्य समजू शकतो. पुरोगामी महाराष्ट्रात जे घडले नाही ते घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. शरद पवार यांनी कधीही जातपात मानली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी एकदा समोरासमोर बसून चर्चा करावी. जेणेकरून कोण किती जातीयवादी आहे, याचा सोक्षमोक्ष लागेल, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले.

छगन भुजबळांचा राज ठाकरेंना सवाल

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे कालचे भाषण पाहता ही सभा लोकमान्य टिळक, रामदास स्वामी आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे गुणगान करण्यासाठी होती का, अशी शंका निर्माण झाल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (chhagan Bhujbal) यांनी केले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे भाषण ऐकल्यास असे वाटायला लागते की, ही सभा फक्त शरद पवार यांच्यावर टीका करण्यासाठी आणि टिळक, बाबासाहेब पुरंदरे यांचे गुणगान गाण्यासाठी होती का?, अशी टिप्पणी भुजबळ यांनी केली होती.

‘राज ठाकरेंनी आजपर्यंत साधी बालवाडीही चालवली नाही’

राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केवळ शरद पवार यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंचे भाषण भोंगे आणि शरद पवार या दोन विषयांबाहेर गेलेच नाही. त्यांच्याकडे सांगायला कुठलाही कार्यक्रम नाही, त्यांच्याकडे कृती करायला काही नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आजपर्यंत साधी बालवाडीची शाळा चालवली नाही. फक्त भाषण करायचं आणि समाजात तेढ निर्माण करायची एवढंच काम त्यांना आहे, अशी टीका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button