breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा’; ‘सरसेनापती हंबीरराव’चं पोस्टर

मुंबई |महाईन्यूज|

हिंदवी स्वराज्याच्या लढ्यातील ‘सिंह’ नरवीर तानाजी मालुसरे यांचा पराक्रम सांगणारा ‘तानाजीः द अनसंग वॉरिअर’ चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा मान मिळविणारे ‘हंबीरराव मोहिते’ यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. गेल्या वर्षी लेखक, अभिनेता, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाची घोषणा केली होती. आज शिवजयंतीच्यानिमित्तानं तरडे यांनी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केलं आहे.

‘जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा’ अशा शब्दांत सरसेनापती हंबीरराव यांचं या पोस्टरवर वर्णन करण्यात आलं आहे. हंबीरराव मोहिते यांची भूमिका कोण साकारणार हे गुलदस्त्यात असलं तरी पोस्ट पाहून प्रविण तरडे हेच हंबीरराव यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. ‘छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून सरसेनापती हंबीरराव तुमच्या समोर हजर … भव्यदिव्य शिवपरंपरा तुमच्यासाठी लवकरच … देवूळबंद आणि मुळशी पॅटर्न नंतर माझं लेखन दिग्दर्शन असलेला पुढचा ऐतिहासिक सिनेमा’, असं कॅप्शन देत प्रविण दरडे यांनी हे पोस्टर शेअर केलं आहे.

‘तुटुन पडला जरी हात, नाही सोडली तलवारीची साथ….’ अशी टॅगलाइन असलेलं पोस्टर प्रविणनं काही दिवसांपूर्वी पोस्ट केलं होतं. तर, चित्रपटासाठीच्या लोकेशन पाहणीला व ड्रोन शुटिंगला सुरूवात झाली आहे. चित्रपटाचे पोस्टर व त्यावरील टॅगलाइन पाहून हा चित्रपट भव्यदिव्य असणार यात काही शंका नाही. जानेवारी महिन्यातच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र कारणांमुळं या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडली. आता चित्रपट येत्या जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button