breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या गाडीचा परळीत अपघात

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेत्यांबाबत अपघाताचे सत्र सुरु आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेनं परतताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये मुंडे यांच्या छातीला किरकोळ जखमी झाले आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी ट्विट करताना केले आहे.
काल धनंजय मुंडे हे परळी येथे अनेक कार्यक्रमानिमित्ताने गेले होते. मंगळवारी दुपारी 12.30 वाजता मतदारसंघातील दिवसभराचे कार्यक्रम आणि सभा उरकून परळीला परतत होते. यावेळी चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि मुंडे यांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारानंतर त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button