breaking-newsआंतरराष्टीय

डॉ. अरिफ अल्वी पाकिस्तानचे नवीन अध्यक्ष

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटचे सहकारी आणि पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक डॉ. आरिफ अल्वी यांची पाकिस्तानचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली. डॉ. अल्वी यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे उमेदवार ऐझाझ अहसान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गटाचे समर्थन असलेले मौलाना फाझी उर रेहमान यांचा तिरंगी लढतीमध्ये पराभव केला.

संसद आणि सिनेटमध्ये गुप्तमतदान पद्धतीनुसार झालेल्या मतदानात डॉ. अल्वी यांना 430 पैकी 212 मते मिळाली. तर रेहमान यांना 131 आणि अहसान यांना 81 मते मिळाली, असे पाकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे. बलुचिस्तानमधील नव्याने निवडून आलेल्या 60 खासदारांपैकी 45 जणांनी अल्वी यांना मतदान केले.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचा गड असलेल्या सिंधच्या विधानसभेमध्ये अहसान यांना 100, अल्वी यांना 56 तर रेहमान यांना एकच मत मिळाले. खैबर पख्तुनवा विधानसभेते अल्वी यांना 78, रेहमान आणि अहसान यांना अनुक्रमे 26 आणि 5 मते मिळाली. तर पंजाब विधानसभेतील मतदानात अल्वी यांना 186, रेहमान आणि अहसान यांना अनुक्रमे 141 आणि 6 मते मिळाली.

यामुळे पाकिस्तानच्या राजकारणावर इम्रान खान यांची पकड अधिकच घट्ट झाली आहे. विद्यमान अध्यक्ष ममनून हुसैन यांचा कालावधी 9 सप्टेंबर रोजी समाप्त होतो आहे. त्यानंतर डॉ. अल्वी हे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button