breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खोपोली येथील स्टिलच्या कारखान्यात भीषण स्फोट, दोन कामगार ठार तर, एक जखमी

खोपोली – खोपोली शहरातील इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड कारखान्यात स्फोट झाला असून या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. एक कामगार जखमी झाला. जखमी कामगारावर नवी मुंबई येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

दिनेश वामनराव चव्हाण (वय ५५) आणि प्रमोद दूधनाथ शर्मा (वाय ३०) यांचा कारखान्यातील स्फोटात मृत्यू झाला. सुभाष धोंडिबा वांजळे (५५) या जखमी कामगारावर नवी मुंबई येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड ही खोपोलीतील जुनी आणि मोठी कंपनी आहे. या कंपनीत भंगारातील लोखंड वितळवण्याचे काम सुरू होते. ही प्रक्रिया सुरू असताना स्फोट झाला. स्फोटात दोन कामगारांच्या शरीराचे तुकडे झाले. स्फोटाच्या तीव्रतेमुळे आसपासच्या परिसराला मोठा हादरा बसला. स्फोटाचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कारखान्यातील स्फोटाची चौकशी सुरू आहे. याआधीही इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड कारखान्यात काम सुरू असताना स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button