breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आज पंढरपूरकडे होणार आहे. वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आज पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. या वर्षीटा हा ३३८ वा पालखी सोहळा आहे. पहाटेपासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. आज संध्याकाळी चारच्या सुमारास माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे.

पायी प्रवास करुन २८ जूनला पालखी पंढरपूरमध्ये जाईल आणि २९ जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी भेट घडेल. लाखो वारकरी माऊलींच्या पालखीत दाखल होतात.

माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक :

प्रस्थान कार्यक्रम रूपरेषा

  • सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे स्पर्श
  • सकाळी ९ ते ११ दरम्यान मंदिराच्या विना मंडपात कीर्तन होईल
  • दुपारी १२ ते १२.३० दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता होईल त्यानंतर समाधीस पाणी घालणे आणि महानैवेद्य दाखवण्यात येईल
  • दुपारी १२.३० ते १ दरम्यान भाविकांना समाधीचे दर्शन हे सुरूच राहील.
  • दुपारी १.३० ते वाजेपर्यंत मानाच्या ४७ दिंड्यांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाईल याच दरम्यान संजीवन समाधी मंदिरात श्रींचा पोशाख देखील केला जाईल.
  • सायंकाळी ४ नंतर पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल तो खालील प्रमाणे असेल तसेच श्री गुरु हैबतबाबा यांचेतर्फे आरती होईल. त्यानंतर संस्थानातर्फे श्रींची आरती होईल. त्यानंतर प्रमुख मानकऱ्यांना नारळाचा प्रसाद दिला जाईल . त्यानंतर विना मंडपात असणाऱ्या पालखीमध्ये श्रींच्या चलपादुकांना प्राणप्रतिष्ठा केली जाईल.

हेही वाचा –

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button