breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रिय

दीर घरी आला, खूप वेळ दार ठोठावलं, घरात वाकून पाहिलं अन् हादरुनच गेला…

भोपाळ । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मध्य प्रदेशातील दमोह येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका महिलेने आपल्या दोन मुलींसह गळफास घेत जीवन संपवलं. शहरातील जटाशंकर बिडी कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांची अवस्था बिकट आहे. पतीमुळे या महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

दोन्ही मुलींचे वय ३ आणि ४ वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांनी पतीवर गंभीर आरोप केले आहेत. २ मुली असल्याने पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्याचवेळी पती आपल्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवले असून आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे.
सॅलरी डेजमध्ये 1 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत अप्लायन्सेसवरील सर्वोत्तम डील शोधा, सॅमसंग, LG, लॉयड आणि इतर अनेक ब्रँड्सवर 40% पर्यंत सूट मिळवा!

पोलिसांनी सांगितले की, महिलेने तिच्या मुलींसह आत्महत्या केली तेव्हा ती घरात एकटीच होती. मृत महिला लताचा दीर घरी पोहोचली असता बराच वेळ घराचा दरवाजा त्याने ठोठावला, पण आतून काहीही प्रतिसाद आला नाही. त्याने खिडकीतून घरात पाहिले असता या तिघींचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हे पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांचे मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. जिल्हा पोलीस अधीक्षक आर तेनिवार यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रकरणी एसपी म्हणाले की, या दुःखद घटनेचा तपास सुरू आहे, प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसते. घटनास्थळावरून विषही सापडले असून, पोलीस मृतांच्या नातेवाईकांची चौकशी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button