breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

औरंगाबादेत दिवसभरात 93 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

औरंगाबाद | औरंगाबादेत कोरोना व्हायरसने हाहाकार केला आहे. शहरात परत एकदा कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळून आले. आज दिवसभरात जिल्ह्यात 93 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं औरंगाबादेतील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 842 इतकी झाली आहे. तसेच आज दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून यामध्ये एक बायजीपुरा येथील 70 वर्षीय वृद्ध व्यक्ती, आणि दुर्गा माता मंदिरजवळील नवीन हनुमान मंदिर येथील 74 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 23 जणांचा बळी घेतलाय. दरम्यान आज मिनी घाटीतून 17 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत 247 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या कोरोना आजाराची खबरदारी म्हणून औरंगाबाद शहर 17 मेपर्यंत 100 टक्के लॉकडाऊन करण्यात आलंय. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेची दुकानं म्हणजेच मेडिकल स्टोअर्स, खासगी दवाखाने सुरू असणार आहे. शहरात लागू असलेला सम विषम तारखेचा फॉर्म्यूला सध्या बंद करण्यात आलाय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button