ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दावडी – निमगावात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

पिंपरी चिंचवड | खेड तालुक्यातील दावडी – निमगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करित आहे.

दावडी -निमगाव परिसरात गेल्या वर्षापासुन बिबट्याचा वावर होता. येथील शेतकऱ्यांच्या जनांवरांवर, शेळ्या मेंढ्यांवर बिबट्या हत्ला करून फस्त करित होता. वनविभागाकडे पिंजरा लावण्याची अनेक वेळा मागणी करूनही वन विभाग याकडे दुर्लक्ष करित होते. बिबट्याचे हल्ले सुरुच होते.

अखेर वन खात्याने दोन दिवसापुर्वी दावडी निमगाव या गावच्या शिवेवर शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. त्यात हा बिबट्या जेरबंद झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button