ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

6 गावे हॉटस्पॉट ; तर 35 गावे बाधित

पिंपरी चिंचवड | खेड तालुक्यातील काही गावांमध्ये सातत्याने रुग्ण मिळून येत असल्याने संबधित गावातून कोरोनाचा फैलाव आणखी होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालवले आहेत. खेड तालुक्यात सहा गावे हॉटस्पॉट बनली असुन प्रत्येक गावातुन घरोघरी कुंटुबनिहाय तपासणी आणि अँन्टीजेन तपासणी करण्याचे काम आरोग्य विभाग आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने सुरु केले आहे.

लक्षणेविरहीत कोरोनाबाधित रुग्ण आढळुन येत असल्याने ग्रामस्थ आता पुन्हा भितीच्या छायेत आले आहेत. खेड तालुक्यात किवळे, गोसासी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, चिंबळी, आणि निघोजे ही सहा गावे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आली आहे.

खेड तालुक्यात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढील प्रमाणे-
बहुळ 1, चांडोली 1, चऱ्होली खु. 1, कडूस 1, करंजविहीरे 1, कोयाळी तर्फे चाकण 1, कोये 1, मेदनकरवाडी 2, महाळुंगे 2, मोई 1, नाणेकरवाडी 1, पाईट 1, सातकरस्थळ 4, सायगाव 1, शेलपिंपळगाव 3, शिरोली 2, शिवे 1, वडगाव घेनंद 1, वाशेरे 1, वाडा 1, वाफगाव 2, येलवाडी 3 असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत. खेड प्रशासनाने चाकण मध्ये 2 रुग्ण मिळाल्याचे सांगितले असून चाकण पालिका प्रशासनाने मात्र 1 रुग्ण मिळाल्याचे सांगितले आहे.

दरम्यान पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडून खेड तालुक्यातील 35 गावे कोरोनाबाधित जाहीर करण्यात आली आहेत. या सर्व गावांमध्ये आता आरोग्य सर्व्हेक्षण मोहिम सुरु केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button