breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पुढील चार दिवस मुंबईसाठी धोक्याचे, ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई – पहिलाच पावसात मुंबईची दाणादाण उडाली आहे. पावसाने सुरुवातच अतिरौद्ररुप धारण करून केल्याने आता पुढील आणखी चार दिवस धुवांधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीतही येत्या चार दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मंगळवार मध्यरात्रीपासून मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पावसाचं आगमन झालं आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. मुंबईत पुढच्या चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढचे चारही दिवस या सगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईची झाली तुंबई

मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी, चुनाभट्टी ते सायन आणि कुर्ला परिसरात पाणी साचल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे वाहतूक १०:२० वाजेपासून, तर हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द रेल्वे वाहतूक ११:१० वाजेपासून थांबवण्यात आली होती. ठाणे ते कर्जत/कसारा आणि मानखुर्द ते पनवेल लोकल वाहतूक सुरू आहे. ट्रान्स हार्बर आणि बीएसयू (उरण) रेल्वे मार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button