breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राणेंच्या ट्विटमुळे आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ खासगी दौऱ्याची माहिती आली समोर

नागपूर – राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे मुक्कामाला होते. प्रशासनाकडून हा त्यांचा खाजगी दौरा असल्याचे सांगण्यात आले. या दौऱ्याबाबतची माहिती पूर्णपणे गुप्त होती. मात्र भाजप आमदार नितेश राणेंच्या एका ट्विटमुळे त्यांच्या या दौऱ्याची माहिती समोर आली.

आदित्य ठाकरे घोसरी येथील एका खाजगी मालकीच्या रिसॉर्टवर थांबले होते. मात्र त्यांचा सोबत वनविभागाने सचिव मिलिंद म्हैसेकर आणि MTDC चे MD आशुतोष सलील देखील होते. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनाही या दौऱ्याची कल्पना नव्हती.

आदित्य ठाकरे सोमवार 15 मार्च रोजी दुपारच्या सुमारास चिमूर मार्गे ताडोबा प्रकल्पात दाखल झाले. त्यानंतर ते सलग दोन दिवस म्हणजे 16 व 17 मार्च दुपारपर्यंत ताडोबात मुक्कामी होतेआदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याची माहिती देताना नितेश राणेंनी ट्विट केले की, मुंबईत आज जवळपास 17 हजार कोरोनारुग्ण आढळले आहेत. दुसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. मात्र हे सर्व घडत असताना मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ताडोबामध्ये व्यस्त आहेत ? मग मुंबईला कोण वाचवणार ?

आदित्य ठाकरेंच्या या खासगी दौऱ्याबाबत प्रशासनाकडून गुप्तता बाळगण्यात आली होती. ते काल (17 मार्च) मुंबईला परतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button