breaking-newsमनोरंजन

हिरकणी: बोरिवलीत चालला रात्री बारापर्यंत शो

मराठी चित्रपसृष्टीमधील दिग्दर्शक व अभिनेता प्रसाद ओकचा ‘हिरकणी’ हा ऐतिहासीक चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीने ‘हिरकणी’ ही मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या अगोदरच प्रेक्षकांची चित्रपटाप्रती उत्सुकता वाढवली होती. त्यामुळे कधी हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि बघायला जातोय अशी भावना अनेकांची होती. ‘हिरकणी’ चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी इतकी गर्दी केली की चित्रपटाच्या तिकीटगृहावर हाऊसफुलची पाटी झळकली होती.

प्रेक्षकांच्या पंसतीचा मान ठेवत हिरकणी चित्रपटाचे शो वाढवण्यात आले होते. दरम्यान ‘हिरकणी’ चित्रपटाचा रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी शो देखील लावण्यात आला होता. बोरीवली येथील मॅक्सस सिनेमाज येथे २ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी हा शो लावण्यात आला होता. खुद्द प्रसाद ओकने यासंदर्भात ट्विट केले आहे. ‘#हिरकणीसाठी खास. रात्री १२चा शो. लोकांचा अभुतपुर्व प्रतिसाद…!!!’ असे लिहित ट्विट केले आहे.

Prasad Oak | प्रसाद ओक@prasadoak17

#हिरकणी साठी खास
“रात्री 12” चा show
लोकांचा अभुतपुर्व प्रतिसाद…!!!

View image on Twitter

१४१८:५२ म.उ. – २ नोव्हें, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता२१ लोक याविषयी बोलत आहेत

‘हिरकणी’ ज्या आठवड्यात प्रदर्शित झाला त्या आठवड्यात मराठी आणि हिंदी असे एकूण पाच चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनसाठी पाच चित्रपटांची मेजवानी मिळाली होती. पण अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाला प्राधान्य दिले. ‘हिरकणी’ चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला आणि लगेच काही दिवसांत, महाराष्ट्रभरात सोमवारी १५० आणि मंगळवारी सुद्धा १५० पेक्षा जास्त शोज हाऊसफुल झाले. इतकेच नव्हे तर एका दिवसात ७० पेक्षा जास्त शोज वाढले आणि महाराष्ट्रात अनेक थिएटर्सदेखील वाढले आहेत.

‘हिरकणी’ हा चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला तर अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल ४’ २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘हाऊसफुल ४’मुळे मराठी चित्रपटाला थिएटर मिळत नव्हते. हिरकणी या मराठी चित्रपटाला थिएटर दिले नाही तर काचा फुटणार, असा सणसणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button