breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

डॅडींनी घेतली नातीच भेट; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई – मराठी अभिनेता अक्षय वाघमारे आणि कुख्यात गुंड अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांच्या घरी ७ मे रोजी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले. अक्षयने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुड न्यूज शेअर केली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच अक्षयने बाळासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अरुण गवळी म्हणजेच डॅडींनी नातीला त्यांच्या मांडीवर घेतले असून ते तिच्याकडे पाहून हसत असल्याचे दिसत आहे. तर आजूबाजूला कुटुंबातील सदस्य खुश दिसत आहेत.

दरम्यान, अक्षय आणि योगिता हे गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ८ मे २०२० रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. मुंबईतल्या दगडी चाळीत हा विवाहसोहळा पार पडला होता. आता त्यांनी आपल्या चिमुकलीचे नाव ‘अर्णा’ असे ठेवले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button