breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शाळा व परिसर सोडियम हायपो क्लोराईडने सॅनिटाइज करा – उपसभापती ना.डॉ नीलम गोऱ्हे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साहित्य जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून खरेदी करून देण्याबाबत झेडपी प्रशासनाने योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश.

पुणे | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक सोडियम हायपो क्लोराईड खरेदी करावे व त्याचे मिश्रण फवारावे, अशि सुचना उपसभापती ना.डॉ नीलम गोऱ्हे यांनी ग्रामविकास विभागास सूचना दिल्या. मान्यता नसलेल्या शाळा सुरू असल्याबाबत पिंपरी चिंचवड येथील पालकांनी मुद्दा उपस्थित केले. त्यावर डॉ गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की, मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणे हा गंभीर गुन्हा असून याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करावा व शिक्षण विभागाला कळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात आज शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पालक आणि संस्थाचालक यांच्यासमवेत आज दुरदृश्य प्रणालीद्वारे उपसभापती कार्यालयाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी उपसभापती ना.डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या, की पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी  सकारात्मक रहावे व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा. ज्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा द्यावी. राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर १७ चालतो तसा तो सीबीएसई, आईसीएससी शाळाबाबत चालेल का याबाबत शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी शिक्षण विभागास केली.

शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश दिले. मुले, शिक्षक व पालक यांचे मानसिक आरोग्य सर्वानी जपावे. शाळांनी तापमान मोजण्यासाठी थरमामीटर,ऑक्सिजन लेवल तपासण्यासाठी ऑक्सिमिटर घ्यावे असे निर्देश दिले. ज्या शाळांनी शासनाच्या सूचना डावलून फी वाढ केली आहे त्या पालकांनी  शिक्षण विभागास कळवावे.ऊच्च न्यायालयातील शाळांनी कोरोना काळात फी वाढ करु नये याबाबत चाललेल्या दाव्यात राज्यसरकारने या महागड्या ईंग्रजी  शाळांची ऊदाहरणे वापरता येतील कां हे तपासून घ्यावे असेही उपसभापतींनी शिक्षणविषयक सचिवांना सुचविले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button