breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावसाळ्यात ‘या’ पिकांची लागवड केल्यास होईल भरघोस फायदा!

सध्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सून पाऊस सक्रिय झाला आहे. अनेक ठिकाणी तर पावसाने कहर केला आहे. तर काही ठिकाणी अद्यापही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. दरम्यान, पावसाचा जून महिना समाप्त आला आहे. जून महिना सुरु झाला असून खरीप पिकांच्या पेरणीसाठी हा महिना सर्वात महत्त्वाचा आहे. अशा हंगामात कोणत्या पिकांची लागवड करावी ज्यामुळे भरघोस फायदा होईल.

सोयाबीन शेती :

सोयाबीन पीक हे एक मुख्य पीक आहे. सोयाबीनमधील प्रथिने, कर्बोदके जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे बाजारात सोयाबीनची मागणी जास्त आहे. या कारणास्तव त्याची लागवड करणे फायदेशीर आहे. सोयाबीनची पेरणी जुलै महिन्यात केली जाते. त्याचे पीक उष्ण हवामानात म्हणजेच दमट आणि गरम हवामानात केले जाते. या पिकासाठी ३० ते ३२ डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक असते. या पिकासाठी ६०० ते ८५० मिमी पावसाची आवश्यकता आहे.

हेही वाचा – ‘अमित शाहांनी दिलेल्या शब्द पाळला नाही’; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

मका पीक :

देशात मका हे खरीप पीक म्हणून ओळखले जाते. परंतु वर्षातून तीन वेळा मका पिकाची लागवड केली जाते. पारंपारिक हंगामात मका जुलै महिन्यात पेरली जाते. उबदार हवामान मका लागवडीसाठी सर्वात योग्य आहे. या पिकाच्या वाढीसाठी ३० डिग्री सेल्सियस तापमान आवश्यक आहे. त्याच्या विकासासाठी सुमारे तीन ते चार महिने समान हवामान आवश्यक आहे. मका पिकासाठी १०० ते १२० सेंमी पाऊस आवश्यक आहे. त्यामुळे पावसाळ्यात मका पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.

कापूस लागवड :

कापसाचे पीक मुख्यतः पावसाळ्यात घेतले जाते. कापसाला सूती धाग्यासाठी मौल्यवान मानले जाते आणि त्या बियाण्याला कापूस बी म्हणतात. कापूस हा मान्सूनवर आधारित उष्णकटिबंधीय पीक आहे. कापसाच्या व्यापाराकडे पाहिले तर ते जगात पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. कापूस उत्पादनात भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. कापूस लागवडीसाठी २१ ते ३० डिग्री सेल्सियस तपमान आणि ५१ ते १०० सेमी पावसाची आवश्यकता असते. पावसाळ्यात ७५ टक्के पाऊस पडला तर पावसाळ्यातच कापसाचे पीक तयार होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button