breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मटण बनवून द्यायला केला उशीर; म्हणून पत्नीचे पाडले दात

पुणे |महाईन्यूज|

पतीने मटन आणून बायकोला बनविण्यास दिले; मात्र यासाठी दीड तास लागेल, असे उत्तर पत्नीने दिल्याने चिडलेल्या पतीने शिवीगाळ करून पत्नीचे दात पाडले. हा प्रकार औंध भागात घडला असून, संबंधित पतीविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली आली.

दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. याबाबत एका ४० वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. प्रभाकरन नाडार (वय ४५) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार आणि आरोपी पती-पत्नी आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रभाकरन दारू पिऊन मटन घेऊन घरी आला. आणि त्याने बायकोला मटन बनवून देण्यास सांगितले. हातात दुसरे काम असल्याने पत्नीने दीड तासाने मटन बनवून देते असे सांगितले.

मटन बनविण्यासाठी इतका वेळ का लागणार आहे, अशी विचारणा त्याने केली. बायको आपले ऐकत नसल्याचा राग आल्याने प्रभाकरनने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाण करताना तोंडावर ठोसा मारल्याने पत्नीचे दात पडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button