TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मिठी नदीत आढळली मगर

मुंबई : धारावीमधील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाजवळ मिठी नदीच्या पात्रात दलदलीत मंगळवारी पर्यावरणप्रेमींना साधारण तीन-चार फूट लांबीची मगर आढळली. या मगरीची सुटका करण्यासाठी तात्काळ बचाव पथकाला पाचरण करण्यात आले. मात्र, भरतीची वेळ असल्याने मगरीला पकडणे अवघड बनले होते. दरम्यान, महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील कर्मचारी आणि बचाव पथक मगरीची सुटका करण्याचे प्रयत्न करीत आहेत.

मिठी नदीच्या किनाऱ्यालगतच्या दलदल भागात मंगळवारी पर्यावरणप्रेमींना एक मगर आढळली. पर्यावरणप्रेमींनी तत्काळ बचाव पथकाला बोलवले. मात्र, भरतीची वेळ असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून पवई तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे तलावातून मगर मिठी नदीत गेल्याची शक्यता आहे, असे मरिन लाइफ ऑफ मुंबईचे सहसंस्थापक प्रदीप पाताडे यांनी सांगितले. भरतीमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे बचाव कार्य थांबविण्यात आले. मात्र, ओहोटीनंतर मगरीची सुटका करण्यात येईल, असे महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button