TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

प्रशासनाला सहकार्य करा, काळजी घ्या : पार्थ पवार

ओमायक्रॉन व्हेरियंट आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील सर्वांचे आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह

पिंपरी l  प्रतिनिधी

पुणे येथे एक आणि पिंपरी-चिंचवड शहरात सहा जणांना ओमायक्रॉन या नवीन व्हेरियंटची लागण झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या अहवालाने स्पष्ट झाले होते. मात्र त्यांच्या संपर्कातील संशयित रुग्णांचे आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी केले आहे.

24 नोव्हेंबर 2021 रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली 44 वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण 6 जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रविवारी दिला होता. तसेच पुणे शहरातील 47वर्षीय पुरुषाला देखील या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या व्हेरियंटबाबत साधक बाधक चर्चा सुरु झाली होती.

परंतु हे व्हेरियंट आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील, कुटुंबातील आणि सोसायटीमधील संशयित रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असा आला आहे. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरियंट आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील कुणालाही अद्याप पर्यंत या व्हेरियंटचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही शहरवासीयांची दिलासा देणारी बाब आहे. याबाबत राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी ट्विट करून पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन केले आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील ओमायक्रोन पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह सोसायटीतील संशयित रुग्णांचे आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील सर्व रहिवाशांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बाब आहे. प्रशासनाला सहकार्य करा. काळजी घ्या, असे पार्थ पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button