breaking-newsताज्या घडामोडीराजकारणव्यापार

1 सप्टेंबरपासून सर्व सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम होणारे काही महत्त्वाचे बदल

कोरोनामुळे, लॉकडाऊनमुळे रोजच्या जगण्यातील अनेक गोष्टी बदलल्या आहेत.आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील अखेरच्या महिन्यात म्हणजेच येत्या १ सप्टेंबरपासून सर्व सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम होईल असे काही बदल होणार आहे.. तसेच सर्व सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यात होणार आहेत. यात प्रमुख्याने LPGचे दर गृहकर्ज, कर्जाचे हप्ते, विमान प्रवास आदींचा समावेश आहे. या गोष्टींचा सामान्य नागरिकांच्या खिशावर देखील परिणाम होणार आहे.जाणून घेऊयात काय बदल होणार आहेत ते…

काय बदल होणार आहेत ?

  • विमान प्रवास- एक सप्टेंबरपासून विमान सेवा महाग होऊ शकते. नागरी उड्डायण मंत्रालयाने एक सप्टेंबरपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी उच्च विमान सुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ASF शुल्कामुळे देशांतर्गत प्रवाशांकडून १५० ऐवजी १६० रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांकडून ४.८५ डॉलरच्या ऐवजी ५.२ डॉलर वसूल केले जातील.
  • LPG चे दर- करोना काळात देशात एका बाजूला महागाई वाढत आहेत. पण सर्व सामान्य नागरिकांना एक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी होण्याची दाट शक्यता आहे.
  • LPG, CNG आणि PNGच्या दरात मोठी कपात होऊ शकते. एक सप्टेंबर रोजी LPGच्या दरात बदल होऊ शकतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलेंडरच्या किमतीत बदल होत असतात. या महिन्यात दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button