breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये संततधार पाऊस, पवना नदीला पूर; पवना धरण 59 टक्के भरले

  • पवना नदीपात्रालगत भाटनगर, संजय गांधीनगर, मुळानगरात पाणी शिरले
  • शंभर झोपड्यांतील सुमारे 400 रहिवाशांचे स्थलांतर

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड, मावळ, परिसरात संततधार पावसाचा जोर कायम राहिला आहे. पवना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून ते 58. 83 टक्के भरले आहे. तसेच शहरात पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या पात्राच्या काठोकाठ भरुन वाहत आहेत. पवना नदीपात्रालगत असणा-या शंभर झोपड्यातील सुमारे 400 रहिवाशांचे पालिका शाळेत स्थलांतर केले आहे. संततधार पावसामुळे आज (शनिवारी) ठिकठिकाणी सखल भागात पाणी साठले तर काही ठिकाणी झाड पडणे, वाहतुक कोंडी निर्माण झालेली आहे. थेरगावचा केजूबाई बंधारा पाण्याखाली गेला आहे.

पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात  शनिवारी ( दि.२७) सायंकाळी 6 वाजेपर्यंत धरणसाठ्यात 58.86% भरले आहे. गेल्या अकरा तासात 111 मिली मिटर पाऊस पडला असून 1 जूनपासून 1487 मि.मि. पाऊस झाला आहे. यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न मिटणार आहे. मावळ पवनानदीवरील बेबडहोळ पुल पाण्याखाली गेला असल्याने सोमाटणे ते पवनानगर वाहतुक बंद करण्यात आली आहे. दमदार पावसाने शेतक-यांना भात लावणीसाठी मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.

शहरात दोन दिवस सतत पडणा-या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे झाडे पडल्याच्या घटना घडल्या. निगडीतील दुर्गानगर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर यमुनानगर येथे झाड कोसळल्याने येथील वाहतूक सुमारे चार तास बंद होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे खूप हाल झाले. फ क्षेत्रीय विभागाच्या उद्यान खात्याचे कर्मचारी, अग्निशामक दल  व निगडी वाहतूक पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून पडलेले झाड दूर करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. स्थानिक नगरसेवक सचिन चिखले यांच्या कार्यकर्त्यांनी झाड लवकर काढण्यास आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले.

अतिरिक्त आयुक्तांकडून नदी पात्रांची पाहणी

गेल्या दोन दिवस संततधार पडणा-या पावसामुळे शहरातील इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्या भरुन वाहत आहेत. तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नाही. त्या पात्रात राहून वाहत असल्यातरी नदी पात्रालगतच्या शंभरहून अधिक झोपड्यांमध्ये पाणी शिरले आहे. पिंपरीतील भाटनगर, संजय गांधीनगर आणि सांगवीच्या मुळानगर झोपड्यांतील सुमारे 400 लोकांना महापालिकेच्या सांगवीतील अहिल्याबाई होळकर शाळा आणि पिंपरीच्या कमला नेहरु शाळेत राहण्याची, जेवणाची व्यवस्था करुन आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका ठेवण्यात आलेली आहे. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी इंद्रायणी, पवना आणि मुळा नद्यांची पाहणी केली. भाटनगर परिसरात सकाळी लागलेल्या कारखान्यांची देखील पाहणी केली. सध्यस्थिती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. मात्र, अद्यापही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने  मावळसह पिंपरी-चिंचवड परिसरात संततधार सुरुच आहे. त्यामुळे नदी पात्रालगत राहणा-या रहिवाशांना सर्तकतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button