breaking-newsराष्ट्रिय

छत्तीसगड्‌मध्ये मालगाडीच्या 3 इंजिनसह 24 डबे रुळावरून घसरले

दंतेवाडी (छत्तीसगड) -छत्तीसगड्‌मध्ये मालगाडीच्या 3 इंजीन्सह 24 डबे रुळावरून घसरले असून त्यापैकी 8 डबे नदीत कोसळले असल्याची महिती पोलीसांनी दिली आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे नक्षलींनी रेल्वे रूळ उखडून टाकल्याने शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली आहे. मालगाडीची इंजिन्स अणि डबे कोसळल्यानंतर नक्षलींनी इंजिन ड्रायव्हर आणि गार्ड यांच्या वॉकी-टॉकीही पळवून नेल्या.

पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थऴी पोहचले असून या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी, राहावी यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती देण्यात आली आहे. रुळावरून घसरलेल्य 24 डब्यंपैकी आठ डबे पुलावरून सरळ नदीत जाऊन पडले आहेत. मात्र घातापाताच्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. नक्षलींविरुद्ध चालू असलेल्या ऑपरेशन प्रहारच्या विरोधात नक्षलींनी दडपशाही विरोधी सप्ताह पाळायचे ठरवले आहे. यात नक्षली अर्थिक्‍ नाकेबंदी करणार आहेत. 28 जून ते 2 जुलैपर्यंतच्या दड्‌पशाही विरोधी सप्ताहाची महिती देणारी पत्रके नक्षलींनी रेल्वे रूळ उखडले त्या ठिकाणी टाकली आहेत.

शिक्षण, सेवा आणि आरोग्य सेवांचे खासगीकरण करून सरकारने जनतेचा विश्‍वासघात केला आहे. त्याच्या विरोधात नक्षली संघर्ष चालूच ठेवणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button