पिंपरी / चिंचवड

वाकड येथील एका हॉटेल मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेची कारवाई

पिंपरी l प्रतिनिधी

बेंगलोर-मुंबई महामार्गावर वाकड येथील एका हॉटेलवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने छापा मारून कारवाई केली. यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत दोन महिलांची वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई शनिवारी (दि. 9) दुपारी बारा वाजता आकारण्यात आली.

राज, आयशा (पूर्ण नाव पट्टा माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगलोर-मुंबई महामार्गावर वाकड येथे आयो टाऊन हाउस या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी हॉटेलवर सापळा लाऊन कारवाई केली. त्यात आरोपी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button