पिंपरी / चिंचवड

पाच कोटी 62 लाखांच्या फसवणूक प्रकरणी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

सांगवी पोलीस ठाण्यात एका बंटी-बबली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पाच कोटी 62 लाख रुपये घेऊन एका दाम्पत्याने फसवणूक केली. ही घटना सप्टेंबर 2020 ते 9 एप्रिल 2022 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.

नारायण रघुनाथ चिघळीकर (वय 52, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल जयप्रकाश गायकवाड, निवेदिता राहुल गायकवाड (रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि इतर लोकांकडून आरोपींनी पाच कोटी 62 लाख रुपये घेतले. रक्कम बुडवण्याच्या हेतून लोकांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून आरोपींनी ही रक्कम गोळा केली. त्या रकमेचा अपहार करून आरोपींनी फिर्यादी व इतर नागरिकांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button