पिंपरी / चिंचवड

पुणे-नाशिक महामार्गावर दोन तर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक अपघात 

तिन्ही अपघातात सहा जणांचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

पुणे-नाशिक महामार्गावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अपघात झाले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या एका अपघातात चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शनिवारी (दि. 9) एमआयडीसी भोसरी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर आहार हॉटेल समोर भोसरी येथे पहिला अपघात झाला. चित्ररेखा कोहिनकर (वय 64) ही महिला रस्ता ओलांडत असताना एका आयशर टेम्पोने त्यांना धडक दिली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चित्ररेखा यांचा मुलगा मुयुर कोहिनकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावरील अपघाताच्या दुस-या घटनेत मुकुंद पाचारणे (वय ४८) या व्यक्तीचा मृत्यू झाला. मुकुंद पाचारणे हे पुणे नाशिक महामार्गावरून दुचाकीवरून जात होते. ते आहार हॉटेल च्या समोर आले असता त्यांना एका ट्रकने धडक दिली. त्यात मुकुंद यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचा मुलगा तेजस पाचारणे (वय 20, रा. कुरुळी, ता. खेड) याने फिर्याद दिली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एक गंभीर अपघात घडला. एका स्कोडा गाडीने ट्रकला मागील बाजूने धडक दिली. त्यात स्कोडा गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 9) दुपारी पावणे चार वाजता गहुंजे स्टेडीयम जवळ घडली. ऋषिकेश मनोज शिंदे (वय 21, रा. बिबवेवाडी, पुणे), शिवं राहुल कोकाटे (वय 19), कुमारी प्रितम रत्येंद्र राठी (वय 20), मोहनीश संगम विश्वकर्मा (वय 20, सर्व रा. पुणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

ऋषिकेश हा स्कोडा कार चालवत होता. गहुंजे स्टेडीयम जवळ आल्यानंतर त्याच्या कारची एका ट्रकला मागून धडक बसली. त्यात चौघांचा मृत्यू झाला. ऋषिकेश याच्यासह ट्रक चालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button