ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

क्रेडीट कार्ड, अ‍ॅक्टिव्ह करताच सगळ्यांना बसला धक्का

जळगाव | न मागवताच घरी पोस्टाने क्रेडीट कार्ड आलं आणि तेच अ‍ॅक्टिव्ह करण्याच्या बहाण्याने मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी प्रौढाची ९९ हजार ८६२ फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सोमवार, ४ एप्रिल रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजीव श्रीराम पाटील वय ५४ हे बेलसवाडी येथील रहिवासी असून शेतकरी आहेत. ३ जानेवारी ते ५ जानेवारी दरम्यान संजीव पाटील यांच्या घरी पोस्टाने सेंट्रल बँक आणि स्टेट बँकेचे असे संयुक्त क्रेडीट कार्ड आले. कुठल्याही बँकेत अर्ज केला नसतांनाही पोस्टाने क्रेडीट कार्ड आल्याचा संजीव पाटील यांना आश्चर्याचा धक्का बसला. याच काळात त्यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी फोन करून बँकेतून बोलत असल्याचे भासविले.

यावेळी पोस्टाने घरी आलेले क्रेडीट कार्ड अ‍ॅक्टिव्ह करण्याच्या बहाण्याने संजीव पाटील यांची ९९ हजार ८६२ रुपयांत ऑनलाईन फसवणूक केली. यादरम्यान संबंधिताने विश्वास संपादन करून संजीव पाटील यांच्याकडून ओटीपी क्रमांक मिळवून त्याद्वारे परस्पर ऑनलाईन खरेदी केली आणि संजीव पाटील यांच्या खात्यातून पैसे खर्च केले. दोन महिन्यांपासून संबंधितांकडून कुठलाही प्रतिसाद अथवा पैसे परत मिळत नसल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री संजीव पाटील यांना झाली.

यानुसार त्यांनी सोमवार, ४ एप्रिल रोजी जळगाव सायबर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button