breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गुजरातमध्ये केमिकल कारखान्यात स्फोट; दोन ठार, १५ जखमी

अहमदाबाद| प्रतिनिधी
 गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. येथील एका केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट झाला, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून, अग्निशमन दलाचे एक पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. कारखान्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरोकेमिकल्स फॅक्टरीत सकाळी दहाच्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्थानिक लोकांनी सांगितले की, स्फोट इतका जोरदार होता की बऱ्याच किलोमीटर अंतरावर या स्फोटाचा आवाज ऐकू आला. त्यामुळे हा स्फोट भयंकर असल्याचे स्थनिकांनी सांगितले. पंचमहाल जिल्ह्यात गुजरात फ्लोरो केमिकल फॅक्टरी असून, त्यामध्ये गुरुवारी सकाळी मोठा स्फोट झाला. या अपघातात कारखान्यात उपस्थित असणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला असून, अन्य १५ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंचमहाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून, सध्या तरी अपघाताचे कारण समोर आलेले नाही.

पंचमहालच्या पोलीस अधीक्षक लीना पाटील यांनी सांगितले की, ही घटना सकाळी १० वाजता घडली. त्यादरम्यान प्लांटला आग लागून १५ कारागीर जखमी झाले. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अडकलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button