#COVID19: पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३२वर; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
पुणे आणि परिसरात एकूण ३२ कोरोनाव्हायरस बाधित रुग्ण आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
तसेच, कोरोनाव्हायरससाठी पॉझिटिव्ह चाचणी घेतलेल्या ५२ वर्षीय व्यक्तीचे सोमवारी दुपारच्या सुमारास निधन झाले. तो मधुमेह आणि उच्च रक्तदाब ग्रस्त होता. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते, असेही महापौर मोहोळ यांनी सांगीतले आहे.
पुणे शहरातील २६ व ग्रामीण भागातील पाच असे एकूण ३२ कोरोनारुग्ण आढळले असून पिंपरी-चिंचवडचे १२ मिळून पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४३ झाली आहे. उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या एकूण १५ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. एकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात सक्रि़य कोरोनाबाधितांची संख्या २७ झाली आहे. या सर्वांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, असेही मोहोळ यांनी सांगितले.