पिंपरी / चिंचवडपुणे

राज्यात ओमायक्रॉनचे 8 रुग्ण, आज 707 कोरोना रुग्णांची नोंद

पुणे | महाराष्ट्रात सात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून, त्यापैकी 6 रुग्ण पिंपरी चिंचवड येथील असून, एक रुग्ण पुण्यातील आहे. यासह राज्यातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आठ झाली आहे. दुसरीकडे आज (रविवारी) दिवसभरात राज्यात 707 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 38 हजार 778 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 86 हजार 782 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.71 टक्के एवढा आहे.

राज्यात सध्या 7 हजार 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजवर 1 लाख 41 हजार 170 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 78 हजार 858 रुग्ण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 916 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 60 लाख 78 हजार 616 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button