breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#COVID19 : निजामुद्दीन मरकज येथे तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेल्या 960 विदेशी पर्यटकांचा व्‍हीजा होणार रद्द

नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन

निजमुद्दीन तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेल्या परदेशी नागरीकांचे व्‍हीजा रद्द करा करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यामध्ये 960 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यांचा व्‍हीजा ब्लॅकलिस्ट करण्यात येणार आहे.

तसेच, गृह मंत्रालयाने दिल्ली पोलीस आणि अन्य राज्यांतील डीजीपी यांना निर्देश दिले आहेत की, संबंधित विदेशी नागरिकांच्या विरोधात विदेशी अधिनियम 1946 आणि आपत्ती प्रतिबंधक अधिनियम 2005 अनुसार कायदेशीर कारवाई करावी.

दिल्लीतील निजामुद्दीन मरकज हे भारतच्या विविध भागांमध्ये कोरोना विषाणू पसरविणारे  केंद्र बनले आहे. तबलीगी जमातशी संबंधित 9000 हजार लोकांची ओळख पटली आहे. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. यामधील 400 नागरिक कोरोना पॉझिटीव्‍ह आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button