breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

राखेत गाव गायब ; फिलिपाइन्सच्या राखेत झाकोळले गाव

मनिला | फिलिपाइन्सच्या बटनगास प्रांतात ज्वालामुखीतून लाव्हा व मोठ्या प्रमाणात राखेचे लोट वाहू लागले आहेत. त्यामुळे लॉरेल प्रांतातील बुसो हे गाव राखेत झाकोळले आहे. १२ जानेवारी रोजी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यानंतर भूकंपाचे धक्के जाणवले होते. ६५ किलोमीटरच्या भागात ज्वालामुखीमुळे संभाव्य नुकसानीची भीती लक्षात घेऊन बटनगास प्रांतातील १४ गावे आता आेस पडली आहेत.

लोकांना घरेदारे साेडून स्थलांतरित व्हावे लागले आहे. प्रांतात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आपत्ती निधी लवकरात लवकर मिळू शकेल. ताल ज्वालामुखीजवळील तलाव व एक नदी कोरडीठाक पडली आहे. हे संकेत लक्षात घेऊन ज्वालामुखीला सक्रिय मानले जाते. सैनिक व पोलिसांनी गावकऱ्यांना ज्वालामुखी शिखरावर जनावरे चराईसाठी घेऊन जाण्यास मज्जाव केला आहे. दरम्यान, मनिला विमानतळाहून ६०० उड्डाणे रद्द झाली आहे. ताल फिलिपाइन्सच्या २४ सक्रिय ज्वालामुखींपैकी आहे. त्यात १९७७ नंतर उद्रेक झाला नव्हता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button