breaking-newsताज्या घडामोडी

#COVID19 : कोरोनावर इलाज नाही…कारण ती अल्लाहची शिक्षा आहे…म्हणणाऱ्याला नाशिक पोलिसांकडून अटक

नाशिक । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणू म्हणजे अल्लाहची शिक्षा…असा नाक-तोंड नोटांनी साफ करणाऱ्या एका महाभागाला आपले कृत्य चांगलेच महागात पडले आहे. अशाप्रकाराचा व्‍हीडिओ बनवणाऱ्या एका व्यक्तीला नाशिक पोलिसांनी अटक केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू म्हणजे अल्लाहची शिक्षा…असा दावा करणे एका व्यक्तीला महागात पडले.  कोरोना विषाणूचा उल्लेख करून नाक आणि तोंड नोटांनी साफ करुन त्याचा व्हिडिओ बनवला. गुरुवारी नाशिक पोलिसांनी त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. याबाबत स्वत: नाशिक पोलिसांनी ट्विटद्वारे माहिती दिली. आरोपींविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी (महाराष्ट्र ग्रामीण) कायदेशीर कारवाई केली असून तो पोलिस कोठडीत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

या, व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसली आहे, जो सुमारे पाचशेच्या नोटांसह आपले नाक आणि तोंड स्वच्छ करीत आहे. या व्हिडिओमध्ये तो असे म्हणताना दिसतो – “कोरोनासारख्या आजारावर इलाज नाही कारण आपल्या लोकांसाठी ही अल्लाहची शिक्षा आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button